सोलापूर- सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कारचा सोलापूर-पुणे महामार्गावर शेटफळजवळ मंगळवारी अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणाला काहीही झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.पुणे उपसंचालक कार्यालयात सुनावणी असल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे मंगळवारी सकाळी पुण्याकडे निघाले होते. मोहोळजवळ गेल्यावर त्यांच्या गाडीमध्ये दोष निर्माण झाला. त्यामुळे दुसरी कार मागून ते पुण्याकडे रवाना झाले. शेटफळ जवळ उसाच्या ट्रॉलीला कारची मागून धडक बसली. या धडकेत कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने शिक्षणाधिकारी जगताप व चालकाने सीटबेल्ट लावल्यामुळे एअर बॅग उघडल्या व कोणासही दुखापत झाली नाही; पण धडक बसल्यानंतर बोनेटवर आदळल्यामुळे शिक्षणाधिकारी जगताप यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सुदैवाने याबद्दल कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सुनावणी लांबणीवर टाकल्याचे सांगण्यात आले.
0 Comments