संच मान्यता सन 2023 24 अनुसार समायोजन पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांची माहिती चुकीची सादर करून शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांची दिशाभूल केली म्हणून गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अक्कलकोट यांना करणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. समुपदेशाने आंतरजिल्हा बदलीने हजर शिक्षकास रिक्त पद नाही सबब आपणास हजर करून घेता येत नाही अशी तोंडी सूचना देऊन गटशिक्षणाधिकारी यांनी सदर शिक्षकास हजर करून घेतले नाही. आंतरजिल्हा बदलीने हजर शिक्षकांना समुपदेशाने पदस्थापना ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे समक्ष दिली जात असल्याने व तात्काळ आदेश निर्गमित करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सूचना असल्यामुळे त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात येते. रिक्त पदाची माहिती चुकीची दिल्यामुळे आणि वारंवार एकाच कामासाठी नसती येत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाचे अवमान करून गैरशिक्षितचे वर्तन केल्यामुळे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अक्कलकोट यांना करणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे
0 Comments