छत्रपती शिवाजी रुग्णालय सोलापूर म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये बी ब्लॉक या विभागात महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात काही दिवसापासून अपयश येत असल्याने निदर्शनास येत आहे. अस्थिरोग विभागात साधारणता अपघात ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असून येथे गोरगरीब गरजू रुग्णाची संख्या ऑपरेशन साठी अधिक प्रमाणात असते. शासन वेगवेगळ्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. परंतु काही अहितकारी सरकारी बाबू या योजना जनतेपर्यंत पोहोचू देत नाहीत.                    सर्वर डाऊन या नावाखाली दोन दोन दिवस अपघात ग्रस्त रुग्णांची कागदपत्रे अपलोड केली जात नाही. दोन दिवस सर्वर डाऊन आहे असे कोणतेही शासकीय कार्यालय असू शकत नाही. यामागे काही प्रायव्हेट हॉस्पिटलचा प्लॅन आहे का हे शोधण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल मधील काही एजन्सी सर्वर डाऊन च्या नावाखाली रुग्णांना त्रास देऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा मार्ग सुकर करीत असावेत, यामध्ये जबाबदार सरकारी बांबूची मदत घेतली जात असावी असा संशय तेथील रुग्णांच्या मनात येत आहे.                                                                                 सर्वर डाऊन तास दोन तास असू शकते, परंतु दोन दोन दिवस सर्व डाऊन असणे आणि प्रशासन त्यावर कोणतीही उपाय योजना न करू शकणे ही संशयास्पद गोष्ट आहे. प्रशासनाने यावर जर मार्ग काढला नाही तर आरोग्य मत्री आणि पालकमंत्राकडे तक्रार करण्यासाठी त्रासलेले पेशंटचे नातेवाईक अवलंब करू शकतात. रुग्णालयाचा प्रशासकीय कारभार पाहणारे सर्व अधिकारी कार्यक्षम आहेत. यांनी सदर विभागांमध्ये लक्ष घालून सर्वर डाऊन ची समस्या दूर करून रुग्णांना लवकरात लवकर ऑपरेशन संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी गरजू नागरिकांतून होत आहे.