Ad Code

Responsive Advertisement

आपल्याच सहकार्याकडून लाच घेताना उत्तर चा नायब तहसीलदार चतुर्भुज

सोलापूर (प्रतिनिधी)- उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारास घेताना पुण्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकास रंगेहात सापडला स्वतच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी 60 हजाराची लाच मागितली त्यापैकी 40.000 हजार स्वीकारताना त्याला पकडण्यात आले चंद्रकांत हेडगिरे असे लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव आहे सोमवारी 15 रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली .तक्रारदार हे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात कार्यरत आहेत त्यांचा काही दिवसांचा पगार प्रलंबीत होता तो पगार काढून देण्यासाठी लाचखोर नायब तहसीलदारांनी 60 हजार रुपयांची मागणी केली होती
तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले नायब तहसीलदार प्रलंबित पगार काडून देण्यासाठी लाच मागत असल्याची तक्रार 5 डिसेंबर रोजी करण्यात आली होती तडजोडी अंती ठरलेली रक्कम नायब तहसीलदारांनी सोमवारी मागितले होती शासकीय कामकाज संपून घरी जाण्यासाठी सायंकाळी पावणेसात च्या सुमारास कार्यालयातच नायब तहसीलदाराने लाच स्वीकारली त्यावेळी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व त्यांच्या पथकाने नायब तहसीलदारास त्याच्याच कार्यालयात रंगेहात पकडले विशेष म्हणजे नायब तहसीलदाराने त्याच्याच कार्यालयात लाच घेतली त्याच्या घराच्या झडतीत 60 हजार रुपयांची रोकड सापडली त्याच्या विरोधात सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments