Ad Code

Responsive Advertisement

पदभार स्वीकारण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सपत्नीक घेतले विठ्ठलाचे दर्शन


सोलापूर / पंढरपूर -  सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपुरात येऊन विठूरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन पत्नी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित होत्या.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा उपरणे आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला. 
कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी असून, यापूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. दर्शनानंतर त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धाराच्या सुरू असलेल्या कामांची बारकाईने माहिती घेतली. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कामांबाबत मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.या प्रसंगी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे आणि मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments