सोलापूर– जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत नंदनवन ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जुळे सोलापूर हा परिसर सुमारे २० वर्षांपूर्वी महापालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झाला असला तरी अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आजही जाणवत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.संस्थेने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये उत्तम व नियोजित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजापूर नाका ते सोरेगाव दरम्यान महिला व पुरुषांसाठी सुलभ शौचालयांची उभारणी, विजापूर रोडवर नियोजित एस.टी. स्टँडची निर्मिती, सार्वजनिक सांस्कृतिक भवन उभारणे तसेच सुशोभित उद्यान (गार्डन) विकसित करणे यांचा समावेश आहे.या निवेदनावर श्री. आपासाहेब कोरे, मोहन अणवेकर, अरविंद उंबरजे, दत्तात्रय जामदार, गुरुपादप्पा रोडगे, रोहिदास वाघमारे, महादेव अययर, रविंद्र देसाई आणि बाळासाहेब पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0 Comments