Ad Code

Responsive Advertisement

आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी 24 26 दरम्यान महा आरोग्य शिबिर..

पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी २४ ते २६ जुलैदरम्यान महाआरोग्य शिबिरपंढरपूर, दि. २३ : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर येथील तीन रस्ता परिसरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिरात वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, उपचार, औषधोपचार, आरोग्य सल्ला तसेच विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गंभीर रुग्णांसाठी एअर अॅम्ब्युलन्स सेवा सज्ज ठेवण्यात आली असून, तातडीच्या उपचारांसाठी विशेष वैद्यकीय पथकेही कार्यरत असणार आहेत. याशिवाय 'आरोग्यसंपन्न वारी' मोबाईल अॅपद्वारे जवळच्या आरोग्य सुविधांची माहिती, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य केंद्रांचे तपशील आणि आपत्कालीन संपर्क उपलब्ध होणार आहेत. शिबिरात आरोग्य शिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चरण सेवा, तसेच आपत्कालीन वैद्यकीय मदत यांचाही समावेश आहे. वारीदरम्यान प्रत्येक वारकऱ्याला वेळेत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, वारकरी भाविकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Post a Comment

0 Comments