Ad Code

Responsive Advertisement

पंढरीच्या वारीचे उत्तम नियोजनाबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांना मुख्यमंत्र्याचे कौतुकाचे प्रशस्तीपत्र...

पंढरपूर -आषाढी एकादशी २०२६ यात्रेदरम्यान लाखो वारक-यांसाठी करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजन, प्रभावी समन्वय आणि प्रशासनाच्या कार्यक्षम अंमलबजावणीबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आषाढी वारीदरम्यान वारकरी सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोहिनकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या गौरवामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतल्याचे मानले जात आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, मंगळवेढ्चाचे आमदार समाधान आवताडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी संदीप कोहिनकर यांच्या कार्याचे कौतुक करत हा सन्मान संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments