Ad Code

Responsive Advertisement

सूर्यकांत भुजबळांच्या संभाव्य आगमनाची जि प सामान्य प्रशासन विभागातील पारंपारिक कर्मचाऱ्यांना अनामिक भीती...

सूर्यकांत भुजबळ यांच्या संभाव्य आगमनाची जि. प .सामान्य प्रशासन विभागातील पारंपारिक कर्मचाऱ्यांना अनामिक भीती

                                सूर्यकांत भुजबळ सोलापूर जिल्हा परिषदेत हजर झाल्यापासून आजतागायत ग्रामपंचायत विभागातील त्यांचे अधिकारी म्हणून उत्तम कार्य सिद्ध झाले आहे. पालकमंत्र्याच्या मदतीने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहकार्याने त्यांनी अनेक कामे सहज आणि लिलया या उत्तम रीतीने पार पाडले आहेत. यास त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ग्रामपंचायत विभागातील अनेक आणि धसका घेतला होता. याची प्रचिती काही महिन्यापूर्वी बार्शी तालुक्यात आली. परंतु काम करण्याची हातोटी आणि जुना अनुभव, सर्वांचे सहकार्य यामुळे त्यांनी ग्रामपंचायत विभागाचा कारभार अतिशय उत्तम पद्धतीने पुढे हाकण्याचा प्रयत्न केला आहे.                                  सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची बदली कोल्हापूरला झाल्यामुळे होणाऱ्या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. परंतु त्यांचे काम करण्याची पद्धत सामान्य प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांना न मानवणारी असल्यामुळे काही कर्मचारी अस्वस्थ असल्याचे समजते.  पाटील आणि भुजबळ यांच्या कार्यशैलीत बराचसा फरक असल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांनी आता भुजबळांची धास्ती घेतलेले समजते.

Post a Comment

0 Comments