जिल्हा परिषद बांधकाम विभाग 1 मध्ये कार्यकारी अभियंत्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून माहिती अधिकार हे पद कोणीही स्वीकारण्यास तयार नाही. कार्यकारी अभियंता खराडे हे हजर झाल्यापासून आज तागायत त्यांनी आपल्या कार्यालयात अतिशय उपयुक्त व कार्यालय यंत्रणा पारदर्शी ठेवण्यासाठी जबाबदार असलेले माहिती अधिकारी हे पद रिक्त ठेवले आहे. याचे कारण मात्र त्यांनी खूप गंमतशीर दिले की हे पद स्वीकारण्यास कुणीही तयार नाही. स्वतः कर्मचाऱ्यावर विश्वास दाखवण्यास कमी पडत असल्यामुळे सदर पण घेण्यास कुणीही धजावत नाही. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आज पर्यंत माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी ही एकच असे अनोखे कार्यालय बांधकाम विभाग क्रमांक एक आहे. जबाबदार कार्यालय प्रमुख म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे पण या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. माहिती अधिकाराचा अर्ज देणाऱ्याने माहितीसाठी अपिलीय अधिकाऱ्याला भेटायचे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा. स्वतः अपिलीय अधिकाऱ्यानेच जबाबदार संबंधित टेबलला माहिती अधिकाऱ्याचा रोल अदा करून माहिती देण्यासाठी आदेश द्यायचा, माहिती देण्यासाठी उशीर झाला तर त्याच माहिती अधिकाऱ्याने रोल बदलून अपिलीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत त्या कर्मचाऱ्याला बरे वाईट बोल सुनवायचे, अशा दुहेरी भूमिकेत कार्यकारी अभियंता खराडे वावरत आहेत. आज पर्यंत बहुरंगी चित्रपटात डबलरोल ही भूमिका पाहण्यासाठी चांगली वाटत होती परंतु जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एक मध्ये कार्यकारी अभियंत्याच्या पदातील डबल रोल नागरिकांना पाहणे अवघड झाले आहे. सदर विभाग पाहणारे अतिरिक्त कार्यकारी कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर या गोष्टीचा लवकरच बंदोबस्त करतील अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिकांनी केली आहे

0 Comments