Ad Code

Responsive Advertisement

बेकायदेशीर अनियमिततेच्या फाईलवर निर्णय घेण्यास विभाग प्रमुखासह कार्यकारी अभियंता नापास.. प्रकरण दडपण्याची वृत्ती




 जिल्हा परिषद बांधकाम विभाग १ यांचेकडून शासनाच्या विविध लाभाच्या बाबतीत अनियमितता करून अनेकांना लाभ दिले. विविध अनियमिते बाबतीत अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी कार्यकारी अभियंता खराडे हे इच्छुक नाहीत. प्रकरणावर निर्णय घ्यायची वेळ आल्यानंतर  विभाग प्रमुख म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे नाव त्यांचे कडून सदैव पुढे केले जाते.                                        अनियमितता करून संगनमताने कर्मचाऱ्याकडून लक्ष्मी प्रसादाचा लाभ घ्यायचा आणि सदर कर्मचाऱ्यांना उपयुक्त असलेला पदभार  द्यायचा अशी परंपरा अनेक वर्षापासून जि प बांधकाम विभाग एक मध्ये सुरू आहे. सदर अनियमितता केलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारी अर्जासह जवळपास चौकशी पूर्ण झालेल्या फाईलवर निर्णय घेण्याची वेळ खराडे येऊ देत नाहीत. जुन्या काळात केलेल्या चौकशीबाबत मी निर्णय घेणार नाही असा पवित्रा ते सदैव घेत असतात. कायदा बाह्य चौकटीने लाभ घेतलेले कर्मचारी मात्र सदैव कार्यकारी अभियंता खराडे यांच्यावर लक्ष्मी प्रसादाचा वर्षाव करीत असतात. विभागीय आयुक्तांनी अनेक प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी पत्र देऊन सुद्धा माझे कुणीही वाकडे करू शकत नाही या सुलतानी प्रवृत्तीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेवर ही वेळ येऊन ठेपली आहे. कोण कोणत्या प्रकरणात बेकायदेशीर मार्गाने अनियमितता झाली आहे याची मालिका आम्ही प्रकाशित करीत आहोत.. क्रमशः

Post a Comment

0 Comments