Ad Code

Responsive Advertisement

होम मैदानाचे सोलापुरी दुर्दैव- भाग एक

होम मैदानाचे दुर्दैव कधी संपणार??? सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध असलेल्या होम मैदानाची प्रत्येक वेळी आणि प्रत्येक वर्षी दुरावस्था ठरलेली असते. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे साहेब आणि प्रवीण गेडाम साहेब यांच्या कारकिर्दीत मात्र सदर मैदानाने उज्वलतेचा श्वास घेतला होता.  कोणत्याही शहराला भूषण वाटावे असे सोलापूर शहरांमध्ये होम मैदान उपलब्ध आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने सदर मैदानावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु दुरुस्तीच्या नावाखाली खर्च केलेले पैसे कधीही मैदानाच्या सुशोभीकरणासाठी उपयोगी आलेत असे नागरिकाला कधीही दिसलेले नाही. येणाऱ्या प्रत्येक डिसेंबर महिन्यात सदर मैदान सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या ताब्यात दिले जाते. देवस्थान कमिटी सदर मैदानाचे भाडे वसूल करते परंतु त्या मैदानाची झालेली दुरावस्था व दुरुस्ती करण्याची जबाबदारी मात्र देवस्थान कमिटी जाणून-बुजून महापालिकेकडे वर्ग करत असते. येऊ दे माझ्या मागल्याप्रमाणे महापालिका ही संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष करून मैदाना ऐवजी ठेकेदाराचे कल्याण करण्यात धन्यता मानून ती जबाबदारी स्वीकारते. परंत या जबाबदारी ढकलण्याच्या कार्यक्रमात नागरिकांचे मात्र हाल केले जातात. कोणतीही सुविधा नसताना क्रीडाप्रेमी तेथे आपल्या क्रीडा साधनेची आराधना करण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. वॉकिंग ट्रॅक व रनिंग ट्रॅक काळाच्या ओघात कोठे गायब झाला आणि स्मार्ट सिटी चे होम मैदानासाठी उपलब्ध झालेले पैसे कोठे जिरले हे दुरावस्तीत असलेल्या ट्रॅक वरून दिसून येते... क्रमशः




Post a Comment

0 Comments