*केंद्र सरकारच्या सर्व प्रसार-प्रचार जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातीमध्ये देशभर सर्वत्र भारत सरकार ऐवजी मोदी सरकार छापण्यात आले आहे.हे संविधान विरोधी आहे.पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे अशी टीका करत सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारची संकल्प यात्रा कार्यक्रम उधळून लावण्यात आला.*
आमदार प्राणितीताई शिंदे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने मध्ये मरिआई चौक,सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले.
*सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात 40 ठिकाणी संकल्प यात्रेत व्हॅन फिरणार आहे. या व्हॅनवर मोदी सरकारची हमी ऐवजी भारत सरकारची हमी असा उल्लेख हवा होता. परंतु या हिटलरशाही मोदी सरकारने भारत देशाचे नाव पुसण्याचे काम करीत आहे. याचा आक्षेप घेत सोलापूर युवक काँग्रेसने ही संकल्प यात्रा बंद पडली व त्या व्हॅनला परत पाठवण्यात आले. जोपर्यंत व्हॅनवर मोदी शब्द हटवून भारत देशाचे नावाचा उल्लेख होत नाही. तोपर्यंत हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या वतीने इशारा देण्यात आला.*
*यावेळी शहराध्यक्ष गणेश डोंगरे,उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष महेश लोंढे,युवक काँग्रेस प्रवक्ता दाऊद नदाफ,विवेक कन्ना,आकाश जांभळे,धीरज खंदारे,अस्लम शेख,सुशीलकुमार म्हेत्रे,आशुतोष वाले,संजय गायकवाड,महेंद्र शिंदे,यासीन शेख,सुरज कांबळे,जीवक इंगळे,मनोहर चकोलेकर,चंद्रकांत नाईक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
0 Comments