धर्मसिलाईन्स येथे एसटी स्टँडच्या समोरील प्रवेशद्वारातून आज प्रवेश करताना मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्लॉटमध्ये घाणीचे आणि कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. सदर परिसरात प्रत्येक घरात लहान मुलांचे वास्तव्य असून अशा घाणीमुळे आणि दुर्गंधीमुळे लहान मुलाचे निरोगी असलेले आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अनेक वेळा स्वच्छता करूनही सदर ठिकाणी परत कचरा आणि इतर टाकाऊ पदार्थ उकिरडा म्हणून येथे टाकले जातात. परंतु याचा परिणाम आता येथील लहान मुलांच्या आरोग्यावर जाणवत असून त्यांच्या आरोग्यासाठी येथील नागरिकांनी तेथे आता कचरा टाकणे बंद केले पाहिजे अशी मागणी येथील नागरिकाकडून केली जात आहे. सदर कचरा टाकण्याचा परिणाम येथील वृद्ध लोकांनाही अनेक वेळा त्रास स्वरूपात झालेला आहे...! अश्या जागेबद्दल महापालिकेने निर्णय घ्यावा ...
0 Comments