सोलापूर : प्रभाग १० जुनाविडी घरकुल येथील ५१ आर्दश माता भगिणींचा, आर्दश पञकार, आदर्श समाजसेवक, आर्दश वाहन चालक मनपा यांचा सन्मान शहर अध्यक्ष संतोष पवार, कार्यअध्यक्ष जुबेर बागवान, अनिल भोसले, गिरीष कोटा, शहर संघटक युवक दत्ता बडगंची, अहमद मसुलदार, यांच्या हस्ते करण्यात आला.जुनाविडीघरकुल जी.ग्रुप येथे श्री मातोळी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेकडून नगरसेविका स्व. कै.दयमंती भोसले व समाजसेवक स्व.कै. कोंडीबा सरवदे यांच्या पुण्यतिथी निमित्त सन्मान सोहळा कार्यक्रम संस्थापक रुपेशकुमार भोसले यांनी आयोजित केला होता.या वेळी संतोष पवार व जूबेर बागवान यांनी रुपेशकुमार भोसले यांचे सामाजिक, राजकिय व रुग्नसेवेचे भरभरुन कौतुक केले. प्रभागतील जनतेनी रुग्णसेवक म्हणुन काम करणार्या रुपेशकुमार भोसले यांना महापालिकेत पाठवावे त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजन पक्षातील नेते आहोत. यापुढील कार्यात त्यांच्या सोबत ही राहू प्रभागत व शहरात त्यांचे काम, लोकांची सेवा ते प्रामाणिकपणे करत असतात व मन लावून करतात असे ते म्हणाले.यावेळी प्रभागाती जेष्ठ माता भगिणी, युवक मिञ परिवार व सामाजिक कार्यकरते मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते. माजी महापौर महेश कोठे, प्रथमेश कोठे यांनी फोन करून सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.मनपा वाहन चालक पांडुरंग शिंदे, लक्ष्मीमण मुरटे, सय्यद सलाउद्दीन, निजामुद्दीन आबादिराजे, शैलेंद्रसिग कैय्यावाले, दिलावर मनियार या पाच वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष दिलावर मनियार यांनी पुरस्कारा दिल्या बद्दल आभार व्यक्त केले. असा सन्मान आमचा आज पर्यंत कोणीच केला नाही ते रुपेश भोसले यांनी केले आम्हाला फार आनंद होत आहे अश्या शब्दात माता भगिनींनी भावना व्यक्त केल्या.या वेळी कृष्णहरी सामल, संतोष भोसले, अंबादास भोसले, प्रेम भोसले, अजय दोरनाल, बालाजी भोसले, आनंद भोसले, विनोद गायकवाड, आकाश माने व प्रभागाती मिञपरिवार यांची ऊपस्थिती होती.सुञसंचालन सामाजिक कार्यकरर्ते मयुर गवते यांनी केले. आभार रुपेशकुमार भोसले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पै.युवराज सरवदे, अनिल भोसले, गिरीष कोटा यांचे योगदान लाभले.

0 Comments