Ad Code

Responsive Advertisement

धाराशिवचे मल्हारी माने महापालिकेचे नवे प्रशासनाधिकारी

सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाला अनेक वर्षांनंतर अखेर पूर्णवेळ प्रशासन अधिकारी लाभला असून नूतन प्रशासन अधिकारीपदी धाराशिव येथील शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या येथील अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे आहे. त्यापूर्वी प्रशासन अधिकारी असलेले संजय जावीर यांना पदोन्नतीने शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई येथे पदस्थापना देण्यात आली. त्यानंतर रिक्त प्रशासन अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार महापालिकेतील सहायक आयुक्त गिरीश पंडित यांच्याकडे सोपविण्यात आला. आठ महिने त्यांनी आणि त्यानंतर माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी चार महिने कार्यभार सांभाळाला. दरम्यान, आता शासनाने धाराशिव येथील शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांची प्रशासन अधिकारीपदी पूर्णवेळ नियुक्ती केली आहे. माने हे एक उपक्रमशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. यापूर्वी त्यांनी नगरपरिषद प्रशासन अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

Post a Comment

0 Comments