सोलापूर (प्रतिनिधी)- सांगोला येथील तहसील कार्यालयांतर्गत संगेवाडी मंडळाच्या महिला मंडळ अधिकारी आणि त्यांच्या खासगी चालकाने तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या शेतजमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी ७,००० रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी (५ मार्च २०२६) सापळा रचून या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.विजया महारुद्र नाईक (वय ४५ वर्षे) - पद: मंडळ अधिकारी, संगेवाडी मंडळ, तहसील कार्यालय सांगोला.व वैभव पिराजी मोरे (वय २८ वर्षे) - खासगी वाहन चालक (खासगी व्यक्ती). यांना अटक करण्यात आली आहे.तक्रारदाराच्या आईने खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तऐवजावर आलेल्या हरकतीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून, ती नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आरोपी श्रीमती विजया नाईक यांनी चालकामार्फत तडजोडीअंती ७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता, मंडळ अधिकारी नाईक यांनी लाचेच्या मागणीला दुजोरा दिला आणि खासगी चालक वैभव मोरे याला पैसे स्वीकारण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने सापळा रचून वैभव मोरे याला ७,००० रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यत आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी सोलापूरच्या पथकाने केली आहे.
0 Comments