सोलापूर (प्रतिनिधी)-सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे महाराष्ट्राचचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्या नेतृत्वाखाली ६ ते १० मार्च दरम्यान कोलंबिया प्रजासत्ताक अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या कालावधीत म्हणजे ४ मार्च ते १३ मार्च दरम्यान सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होईपर्यंत हा अतिरिक्त पदभार जंगम यांच्याकडे असणार आहे. तसे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ५ मार्च रोजी काढले आहे. त्यामुळे ४ मार्च ते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे कार्यालयात हजर होईपर्यंत जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार जंगम यांच्याकडे असणार आहे.
0 Comments