Ad Code

Responsive Advertisement

कार्यकारी अभियंता खराडे यांना माहिती अधिकारी पद रद्द करणे साठी सल्ला देणारा जि. प. मधील मास्टरमाइंड कोण??



माहितीच्या अधिकाराचा कायदा महाराष्ट्रासह केंद्राने स्वीकारल्यामुळे स्वच्छ प्रशासनाला गतिमानता येण्यास मदत झाली. आज पर्यंतच्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये आज तागायत कोणत्याही विभागाने माहिती अधिकारी पद रिक्त ठेवले नाही. माहिती अधिकारी पदामुळे माहिती मागणाऱ्या व्यक्तीस सदर माहितीअधिकाऱ्याकडून त्या विभागात चालू असलेल्या स्वच्छ प्रशासनाचा अंदाज येतो.                               सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभाग १ या कार्यालयाने विद्यमान सुरू असलेलेली माहिती अधिकारी ही आस्थापनाच रद्द केली. कोणत्या अधिकारात अथवा कोणत्या कायद्याने माहिती अधिकारी पद रद्द करता येते याचा खुलासा कार्यकारी अभियंता खराडे करतील काय? माहिती अधिकारी या आस्थापनेत  विभाग प्रमुख म्हणून खराडे व्यक्ती बदलू शकतात, आपल्याला हवी असलेली व्यक्ती त्या जागी नेमणूक करू शकतात. खराडे यांच्या दृष्टिकोनातून माहिती अधिकारी पदावर काम करण्यासाठी बांधकाम विभागात एकही व्यक्ती पात्र नाही काय? सदर विभागात पात्र व्यक्ती नसेल दुसऱ्या विभागातून मागवून घेण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले याचाही खुलासा करावा.                                         जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता पदाला फक्त कामाची वर्क ऑर्डर देणे आणि एमबी वर सह्या करणे एवढेच काम आहे काय? इतर प्रशासकीय कामकाज करताना आणि निर्णय घेताना खराडे यांचा हात कायम आखडलेला असतो.                      बांधकाम विभागातील प्रशासकीय स्वच्छता मोहीम राबवण्याची वेळ येते, त्यावेळी खराडे यांनी अतिरिक्त कार्यकारी  अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या आड दडणे पसंत केले आहे. तक्रारी अर्जा संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या पत्रावर कोणती कारवाई केली? याची माहिती जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे खराडे यांना विचारावी लागते.  आमचे विभाग प्रमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा करून तुम्हाला माहिती देतो, असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेतात. प्रशासकीय काम करताना अनियमिता आणि भ्रष्टाचार याला तोंड देण्याची प्रथम जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखावर असते. फायदा आणि लाभ असेल तिथे मी आणि जबाबदारीचे आणि निर्णय घेण्याचे काम असले की अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशी दुटप्पी भूमिका खराडे यांनी साकार केली आहे.                                                                             माहिती अधिकारी पद रद्द करून जिल्हा परिषदेची बदनामी करण्यासाठी खराडे यांचा जिल्हा परिषदेमधील मास्टरमाइंड कोण हे शोधण्याचे आव्हान  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वीकारले पाहिजे.


Post a Comment

0 Comments