Ad Code

Responsive Advertisement

माध्यमिक शिक्षण विभागात एकाच टेबलचे कायमस्वरूपीे टेंडर घेणाऱ्या बहाद्दराचा मलिदा सामान्य प्रशासन विभाग बंद करणार काय??




सोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाने माध्यमिक शिक्षण विभागाला काही कर्मचारी अंदन स्वरूपात दिली आहेत अशा कर्मचाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागाचा अंकुश राहिला नसून सदर कर्मचारी स्वयंभू आहेत. एकाच टेबलला वर्षानुवर्षी चिकटून राहिल्यामुळे माझे कोणी वाकडे करू शकत नाही अशा अविर्भावात सदर कर्मचारी जीपचे सीईओ मनीषा आवळे यांना सुद्धा चॅलेंज करण्याच्या भूमिकेत दिसतात.                                        ‌‌ माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अगदी ब्रह्मदेव आला तरी सुधारणा करू शकत नाही अशी अवस्था आहे. भ्रष्टाचार च्या दलदलीत आणि चिखलात अडकलेल्या या विभागातील सदर कर्मचारी म्हणजे या चिखलात फुललेले कमळ आहेत. नैवेद्याचे ताट दाखवल्या शिवाय कोणत्याही शिक्षकाची फाईल पुढे सरकवली जात नाही. जीपचे मुख्य अधिकारीच कुलदैवत होऊन नैवेद्याचे भुकेले आहेत त्यामुळे आम्ही तर किरकोळ पुजारी अशी भूमिका चिकटून बसलेले कर्मचारी मांडताना दिसतात.                                                                    आम्ही स्वतः सदर कर्मचाऱ्यांच्या एकाच टेबलला चिकटून बसल्याबद्दल सामान्य प्रशासन विभागामध्ये चौकशी केली असता सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्राथमिक विभागात केली असून प्राथमिक विभागाने त्यांना माध्यमिक विभागात नियुक्ती दिली आहे. म्हणजे प्रत्येक विभाग आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देण्याच्या प्रयत्नात दिसतो. याच गोष्टीचा फायदा चटवलेले कर्मचारी घेताना दिसत आहेत. अशा चटवलेल्या कर्मचाऱ्यांमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असून सदर गोष्टीला पायबंध घालण्याचे काम सोलापूर जीपच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम करतील काय??

Post a Comment

0 Comments