सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दलित वस्तीच्या कामाबद्दल संशय निर्माण झाला असून संशय वाढवण्यासाठी समाज कल्याण विभागातील कर्मचारीच करणीभूत असल्याचे निदर्शनास येत आहे. पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरी अप्पा प्रक्षाळे यांनी सन 2023 24 या वर्षात सोलापूर जिल्ह्यात तालुका निहाय मंजूर दलित वस्ती योजनेची कामे आणि सदर कामासाठी आलेली शिफारस याची माहिती मागितली होती. माहिती मागितल्यापासून आजतागायत अपिलात गेले तरी सदर माहिती देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. अपील करणारी व्यक्ती प्रत्यक्ष कार्यालयात येऊन माहिती देण्याची विनंती करून गेली, तरी संबंधित टेबलच्या व्यक्तीने आज तागायत माहिती देण्याऐवजी दडपण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती दडपली जाते याचा अर्थ दलित वस्तीच्या कामांमध्ये मंजुरी देताना"गोलमाल है भाई सब गोलमाल है" . तत्कालीन समाज कल्याण विभागाचे प्रमुख यांनी कोणाशी कसे संगणमत करून कामाची मंजुरी मिळवून घेतली हे सर्व शोधण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आव्हाळे मॅडम यांच्यावर आहे. आव्हाळे मॅडम या जबाबदार आणि कार्यक्षम अधिकारी असल्यामुळे याची पाळीमुळे त्या शोधून काढतील अशी सोलापूर जनतेला खात्री आहे.
0 Comments