मुंबई - आझाद मैदानावर सुरू असलेले पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलन दुसरे दिवशी सुरू होते. महाराष्ट्र राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे विविध मागण्या बाबत आज मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे सचिव , अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग, अभियान संचालक जलजीवन मिशन, अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण उपस्थित होते. या बैठकीत वेतन अदा करणे बाबत तोडगा काढणेत आला आहे. याबाबत उद्या लेखी आश्वासन दिलेनंतर आझाद मैदान सोडणार अशी भुमिका राज्य कृती समितीचे वतीने घेणेत आली. नागपूर चे निखिल रौंदाळकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेमुळे प्रशासन गतिमान झाले. मुख्य सचिव यांचे बैठकीत न्यायप्रविष्ठ असलेले व न्यायालयाने निवाडे दिलेले कंत्राटी कर्मचारी यांचे बाबत शासन सेवेत कायम करणे साठी समिती गठित करणेचा शासन निर्णय काढणेत आला आहे. यामुळे राज्य कृती समितीचे प्रयत्नात यश आले आहे. असेही कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत यांनी सांगितले. आज आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलनाचे पार्शवभुमीवर जीटी रूग्णालय परिसरातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात आज प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषिकेश शीलवंत, उपाध्यक्ष बंडू हिवरे, सचिन थोरात, गणेश चव्हाण, निखील रौदाळकर, निवृत्ती शेडगे, संदीप सुखदान, नागपूर बीआरसी संघटनेचे प्रविण तेलतुंबडे, वाॅश व पीएमयू चे मोक्षदी बारसकर यांचे उपस्थितीत झालेले बैठकीत विभागाचे कर्मचारी यांचे ९ मागण्या बाबत समिती गठीत करणेचा निर्णय घेणेत आला आहे. कृती समितीने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) , जिल्हास्तर कर्मचारी, बीआरसी सीआरसी व वाॅश पीएमयु अंतर्गत कर्मचारी यांचे वेतनासाठी आग्रही राहिली.आकृतीबंध व मॅचचे निर्णयानुसार कायम करणेची मागणी करणेत आली. अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदाळ यांनी आंदोलन स्थळी भेटून कर्मचारी यांचे भावना व मागण्या जाणून घेतल्या. दहा मागण्यांवर मा प्रधान सचिव यांचे मान्यतेने समिती गठीत करणेत येत असल्याचे सांगितले.
आंदोलनातील घोषणांनी आझाद मैदान दणाणले.मुंबई येथे आझाद मैदानावर पाणी स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलनातील घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.आझाद मैदानावर साडेचारशेपेक्षा अधिक कर्मचारी यांनी न्यायिक मागण्या साठी घोषणांनी आंदोलन परिसर दणाणून गेला.बंडू हिवरे, नम्राता गोस्वामी, निखील रैदाळकर, सचिन थोरात, कुमार शिॅदे, निवृत्ती शेडगे, संदूप सुखदान, डाॅ. संजय वाघ, राजा भोसले, बीआरसी सीआरसी चे प्रविण तेलतुंबडे, सुनील सावंत, अनिल निचितें,संपदा बोधनकर , राजेश मोरे, यांनी मार्गदर्शन केले.
आदेश आलेनंतरच आझाद मैदान सोडणार - रमाकांत गायकवाड-महाराष्ट्र राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे मागील सुमारे पाच महिन्यापासून प्रलंबित अदा करणे बाबत आज मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीचे इतिवृत्त व विभागाचे पत्र प्राप्त झालेनंतरच आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय अध्यक्ष कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे. आज जलजीवन मिशन चे बंडू हिवरे व शंकर बंडगर यांनी अतिरिक्त अभियान संचालक देशपांडे मॅडम यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्य सचिव यांचे बैठकीत जलजीवन मिशन चे कर्मचारी यांचे वेतनाबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यवाही करणेचे सुचना - सचिन जाधव-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलेने खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शी चर्चा करून आज राज्य
कृती समितीचे पत्रावर प्रधान सचिव यांना अभिप्राय देऊन प्रधान सचिव पराग जैन यांना तातडीची कार्यवाही करणे साठी निर्देश दिले आहेत. नागपूर चे निखिल रौंदाळकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे आज प्रशासन गतीमान झाले असल्याचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.आमदार व विविध संघटनांचा पाठींबा- ऋषीकेश शिलवंत-आंदोलक नम्रता गोस्वामी यांचे विनंती नुसार शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज आंदोलन स्थळी भेट देऊन राज्य कृती समिती व आंदोलक यांची भेट घेतली. सायंकाळी ५ वाजता त्यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कर्मचारी यांचे मागण्या मांडल्या. आज राज्यातील विविध संघटनांनी पाठींबा देऊन प्रेरणा दिली.
0 Comments